‘भारत जोडो यात्रा’ : राहुल ‘सत्ता’ नाही, ‘राजकारण’च बदलायला निघालाय!
प्रेम, भाईचारा, आपुलकी ही शाश्वत भारतीय मूल्यं आहेत. ‘भारत जोडो’ या मूल्यांचा उत्सव आहे. एकमेकांशी ओळख पाळख नसलेली हजारो माणसं रोजच्या रोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत चालतात, एकमेकांच्या गळ्यात पडतात, हातात हात घेतात, मिठ्या मारतात, रडतात, हसतात आणि तेही अशा ठिकाणी जिथे सतत दोन लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या पक्षाने यात्रा काढलीय! ‘भारत जोडो’ यात्रा हा या देशाच्या अंगभूत माणुसकीचा उत्सव आहे!!.......